Mahindra Treo Plus इलेक्ट्रिक रिक्षा,५० पैशात १ किमीची रेंज,खरेदीवर मिळेल १ लाख ३ हजारांची सूट

अवघ्या ५० पैशात १ किलोमीटरची रेंज मिळणारी Mahindra Treo Plus इलेक्ट्रिक रिक्षा लाँच करण्यात आली आहे. या रिक्षा खरेदीवर ३७ हजार रुपयाची सूट सुद्धा मिळणार आहे. जाणून घ्या या रिक्षा संबंधी डिटेल्समध्ये.

Mahindra Treo Plus

Mahindra Treo plus इलेक्ट्रिक रिक्षा महाराष्ट्र राज्यात लाँच करण्यात आली आहे. याची किंमत ४ लाख १६ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक रिक्षावर केंद्रकाडून ७१ हजार आणि राज्याकडून ३० हजार रुपयाची सब्सिडी सूट दिली जाणार आहे. ३१ मार्च २०२४ आधी खरेदी केल्यास १ लाख ३ हजार रुपयाची सब्सिडी सूट दिली जाणार आहे. कंपनीचा दावा आहे की, हे सीएनजीच्या तुलनेत ५ वर्षात २ लाख रुपयाची बचत करू शकते.

Mahindra Electric बाजारात आपली Mahindra Treo plus इलेक्ट्रिक तीन चाकी वाहन विक्री करीत आहे. याला देशातील काही राज्यात विकले जात आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री दिवसेंदिवस वाढत आहे. यात तीन चाकी वाहनांचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे ही मागणी लक्षात घेऊन कंपनीने देशातील सर्वात जास्त विकली जाणारी इलेक्ट्रिक तीनचाकी ट्रियोला महाराष्ट्रात उतरवले आहे.

Mahindra Treo plus च्या स्पेसिफिकेश

विशेषतामहिंद्रा Treo
बॅटरी क्षमता48V (स्थापित) – 10.24 kWh
चार्जिंग समय (0-100%)3-4 तासात
गाडीची प्रकार३ सीटर ई रिक्षा
टॉप स्पीड५५ किमी प्रति तास
प्रमाणित रेंज१७० किमी
ड्रायविंग रेंज१५० किमी
पीक पॉवर8kW
पीक टॉर्क42 Nm टॉर्क
ट्रान्समिशनडायरेक्ट ड्राइव्ह ट्रान्समिशन
वारेंटी ३ वर्ष किंवा ८० हजार Km
ऑन रोड किम्मत ३ लाख ४७ हजार

Mahindra Treo च्या सस्पेंशन मध्ये पुढच्या बाजुला फ्रंटला हेलिकल स्प्रिंग प्लस डॅम्पर प्लस हायड्रोलिक शॉक एब्जॉर्बर, रिजिड रियर एक्सल, लीफ स्प्रिंग आणि शॉक एब्जॉर्बर दिले आहेत. ब्रेकिंगसाठी पुढच्या बाजुला आणि मागील बाजुला हायड्रोलिक प्रकारचे ब्रेक दिले आहेत.

कंपनीचा दावा आहे की, हे ५० पैशात १ किलोमीटरचे अंतर पार करू शकते. ही इलेक्ट्रिक रिक्षा ४२ न्यूटन मीटरचे टॉर्क जनरेट करते. सोबत कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे ५ वर्षात १५०००० किमी पेक्षा जास्त चालते. या इलेक्ट्रिक रिक्षावर ३ वर्षात ८० हजार किमीची वॉरंटी दिली जात आहे. Mahindra Treo ची अधिक माहिती 1800 120 150150 वर मिस्ड कॉल देवून मिळवता येवू शकते.

या इलेक्ट्रिक रिक्षाला ५० हजार रुपयाच्या डाउनपेमेंटवर खरेदी करता येऊ शकते. यासाठी महिंद्रा फायनान्स मदत करणार आहे. तर एसबीआय १०.८ टक्के दराने फायनान्स उपलब्ध करीत आहे. ग्राहकांना या इलेक्ट्रिक रिक्षावर ७ हजार ५०० रुपयाचा एक्सचेंज बोनसचा लाभ मिळू शकतो. याला 16 A सॉकेट चार्जरने चार्ज करता येऊ शकते. हे इलेक्ट्रिक रिक्षा सोबत येते.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, २०२५ पर्यंत देशात तीन चाकी वाहन सेगमेंट मध्ये ३० टक्के इलेक्ट्रिक वाहनांची भागेदारी असु शकते. कमर्शियल तीन चाकी वाहन सेगमेंट मध्ये डिझेलने इलेक्ट्रिक वाहनात परिवर्तन पाहून कंपनीने लवकरच बाजारात ५ नवीन इलेक्ट्रिक वाहने घेवून येणार असल्याची घोषणा केली आहे. महिंद्रा आपल्या कमर्शियल तीनचाकी वाहन सेगमेंट मध्ये इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढवण्यासाठी काम करीत आहे.

Mahindra Treo च्या देशभरात १३ हजार यूनिटची विक्री झाली आहे. आपल्या सेगमेंट मध्ये ६७ टक्के भागीदारी ठेवली आहे. या इलेक्ट्रिक रिक्षा यूनिटसाठी परमिट आणि बैचची सुध्दा गरज पडत नाही. सामान्य किंवा सीएनजी रिक्षाच्या बदल्यात ग्राहक इलेक्ट्रिक रिक्षाची निवड करू शकतात. जे शहरात ट्रान्सपोर्टसाठी फायदेशीर आहे.

Also Read:

जमीन का सरकारी रेट क्या है ऐसे जाने 2023

Leave a Comment

%d bloggers like this: